Sunday, 26 July 2020

#ग्रामसेवकाची कामे आपणास माहीत आहेत काय..?


             #ग्रामसेवकाची कामे आपणास माहीत आहेत काय..?

                #ग्रामसेवकाची कामे कोणती हे जाणून घेऊ*

● ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.
● ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
● गावातील लोकांना आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे.
● लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे.
● करवसुल करणे.
● जनतेला विविध प्रकारची दाखले देणे.
● जन्म-मृत्यू, उपजतमृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हनून काम पाहणे.
● बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कामकाज करणे.
● मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज करणे.
● बांधकाम कामगार यांची नोंदणी करणे.
● जनमाहिती अधिकारी कामकाज करणे.
● जैव विविधता समिती सचिव म्हणून काम करणे.
● विवाह नोंदणी निबंधक कामकाज करणे.
● आपत्कालीन समिती सचिव म्हणून कामकाज करणे.
● झाडे लावणे.
● ग्रामसभेचा सचिव म्हणून कामकाज करणे.

**ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी वा चिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते.त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते.

जनहितार्थ:
मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
Affiliate of Muktai Foundations.
@विकास पाटील-बाबर.

No comments:

Post a Comment