Wednesday, 15 July 2020

आपला रेशन संबंधी प्रश्न रेशनिंग कृती समिती आणि jhatkaa.org च्या मदतीने सोडवा. - बिनधास्त फोन करा.! 18001024103




आपला रेशन संबंधी प्रश्न रेशनिंग कृती समिती
आणि jhatkaa.org च्या मदतीने सोडवा. - बिनधास्त फोन करा! 18001024103

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.
यातली सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे रेशनची उपलब्धी.!
आपल्यापैकी अनेकजण बाहेरगावी अडकले आहेत..
कुणाकडे रेशनकार्ड नाही. कुणाचे आधार कार्ड त्याला जोडलेले नाही..
काहींचं सगळं योग्य आहे तरीही रेशन दुकानदार धान्य देत नाही, आरेरावी करतोय?
कोरोनाच्या संकट काळात शासनाने काही रेशनिंगसंबंधी योजना आणल्या आहेत त्या माहित नाहीत..
हे आणि असे कोणतेही प्रश्न भेडसावत असतील,
तर वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा.. आमच्याशी बोला..
कोरोनाशी निगडित माहिती मिळवण्यापासून तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांवर..
आम्ही मदत करु..!
18001024103
अशा अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना मदत व्हावी म्हणून jhatkaa.org आणि रेशनिंग कृती समितीच्या माध्यमातून हि हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
हेल्पलाईनवर हजारो फोन आल्यामुळे यंत्रणेचा ताण अचानक वाढला आहे. Maintenance साठी शनिवारी व रविवारी हेल्पलाइन बंद राहील. आपला फोन लागला नसेल तर सोमवार ते शुक्रवार दहा ते सहा या वेळेत फोन करावा. तसदीबद्दल क्षमस्व.
18001024103
                            
        जनहितार्थ प्रकाशित.
 मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
        Affiliate of Muktai Foundations.
    @विकास पाटील-बाबर.

1 comment:

  1. फार चांगला उपक्रम राबविल्या बदल खूप खूप धन्यवाद, परंतु काही लोकांना मार्च महिन्या पासून मिळाला नाही आणि वन नॅशन वन रेशन कार्ड ची कोणतीही अंमल बजावणी नाही नुसती अर्थ मंत्रालय यांनी पोकळ घोषणा केली आहे, रेशन दुकानदार देत नाही तरी मद्यमांनी त्वरित लक्ष घालावे.

    ReplyDelete