Friday, 31 January 2020

*आपल्या मदतीचं दान, ठरेल त्यांना वरदान*
गरीब व होतकरू मुले/मुली जे MPSC/UPSC अथवा इतर स्पर्धा परिक्षा देण्यासाठी इच्छुक आहेत, अथवा देत आहेत; पण परिस्थितीमुळे त्यांना पुस्तके पण घेता येऊ शकत नाहीत; अश्या मुलां/मुलींकरता  || मुक्ताई || फाउंडेशन्स् चे "दानशूर भाऊसाहेब पाटील सार्वजनिक ग्रंथालय" वतीने MPSC/UPSC वाचनाचा वेगळा विभाग आम्ही चालू करीत आहोत. त्या अंतर्गत वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन व पुस्तक शृंखला या सोयी आम्ही मुलांना पुरविणार आहोत.
आमचे या उपक्रमाला मदत होण्यासाठी ज्यांना कोणाला MPSC/UPSC चे पुस्तके स्वरूपात अथवा देणगी स्वरूपात मदत करावयाची असेल तर आम्ही स्वीकारू शकतो.
जे योगदान आपण देत आहात, त्यामुळे त्यांचे करियर घडण्यास आपला हातभार मोलाचा ठरेल. त्या करिता आपली मदत आम्हाला  निश्चितच खुप अनमोल असेल, आणि आपली मदत आम्हासाठी स्वागतार्ह आहे.
 संपर्क: www.muktaifoundations.org
Tel: 7350008383/7350008989

पाणीदार आमदार शंकरराव गडाख

पाणीदार आमदार म्हणून ओळख असणारे माननीय आमदार शंकरराव गडाख यांना अपक्ष असूनही त्यांच्या जलसंधारणचे भरीव कार्य बद्दल जलसंधारण मंत्री पद देणे सरकारला भाग पडले. असेच इतरही राजकीय नेत्यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रलंबित गोष्टी (प्रश्न) मार्गी लावले तर सुजलाम सुफलाम महाराष्ट्र होणे दूर नाही.