Tuesday, 28 July 2020

#सरपंच. उपसरपंच. ग्रामपंचायत आणि सहकारी सोसायटी पदाधिकारी कसा असावा.,? राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ऐवजी गावाच्या विकासासाठी समाजसेवक असावा.

             

                               #सरपंच. उपसरपंच. ग्रामपंचायत आणि सहकारी सोसायटी पदाधिकारी कसा असावा.,? राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ऐवजी गावाच्या विकासासाठी समाजसेवक असावा.

✅ गावामधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोळी भाजणारा नसावा जर गावात भांडणे झाली तर ती मिटवणारा असावा नाही की वाढवणारा नसावा. 

✅ गावचा होणारा गावात रहाणारा असावा,जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा.

 ✅ गावाच्या विकासासाठी आलेला 14 वा वित्त आयोग निधी सर्व मिळून म्हणजे ग्रामसेवक,आणि स्वयंघोषित लोकल नेते,आदी जन वाटून खाणारे नसावे पुन्हा गाववाल्यांना माहीत झाल्यावर आम्ही पैसे देतो म्हणून पुन्हा पैसे बुडावणारे लबाड नसावेत.

✅शासनाचे स्कीम  लाभार्थींना फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारे नसावा. उदा, घरकुलासाठी पाच दहा हजार रुपये घेऊन पार्टी करणारा नसावा.

 ✅ MRGS मधून  मिळालेल्या विहिरीच्या लाभार्थीकडून दहा पंधरा हजार घेणारा नसावा.

✅ दारिद्रय रेषेत नाव घालण्यासाठी दोन हजार रुपये घेणारा नसावा.

✅ग्रामपंचायत सदस्य, सदस्या आपल्या वार्ड तील समस्याची जाणीव असणारा असावा आणि पोटतिडकीने कामे करणारा असावा.

✅ गावातील गरीबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत करणारा असावा.

✅लोकांना खोटी आश्वासने देऊन लोकांना नोकरी लावतो.अडचणीच्या काळात पैसे देऊन व्याज उकळणारा आदी मार्गाने लुबाडणूक करून लोकांची दिशाभूल करणारा नसावा.
 
✅गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनेची काम अर्धवट करून पूर्ण बिल उचलणारा आणि शाळेतील मुख्याध्यापला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा.

✅सर्वात महत्वाचे म्हणजे गावासमोर आमचे भांडण आहे असे दाखवून गावासाठी आलेले पैसे वाटून खाणारा नसावा.

✅ गावातील सर्व पदे आपल्याच घरात ठेवणारा तर नकोच, उदा भावाला एक पद, बायकोला एक पद, चुलत भावाला एक पद, स्वतःला अनेक पदे,आणि सब माल अंदर सगळं मलाच पहिजे अशी भावना असणारा नसावा.

✅गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा.

✅सामान्य नागरिक ग्रामपंचायत, सोसायटी कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर त्याच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा असावा.

✅ गावातील घनकचरा गटारी रस्ते यांचे नियोजन करून स्वच्छ ठेवणारा आणि प्रशासनावर वचक ठेवणारा असावा.

✅कायम वर वर गोड गोड गप्पा
मारून हात हलुन फसवनारा तर अजिबात नसावा.

✅जवळच्या व्यक्तीची कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा.

✅पदग्रहण झाल्यावर फक्त आपल्याच पँनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पँनलच्या लोकांची कामे करायची नाही असा  नसावा.

✅पदग्रहण झाल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारा असावा.

✅हे  लोक  गावात राहणारे असावेत गावातील कोणत्याही संस्थाच्या निवडणूका आल्यावर गावात येणारा नसावा आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकांच्या पाय पडणारा नसावा.

✅ग्रामस्थांनो👬जर का वरील गुण तुमच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत आणि सहकारी सोसायटी पदाधिकारी यांच्यात दिसले नाहीत तर तुमच्या गावाच्या विकासाला खिळ बसलीच म्हणून समजा. याकरिता योग्य व्यक्तीची निवड होणे गरजेचे आहे, हे कायम लक्षात ठेवा.

                 *****मी समाजाचा एक प्रमुख घटक आहे. गाव ही संघटना नाही. गाव हा राजकीय पक्ष नाही. गाव हे मानवतेचे महान मंदिर आहे, कि जेथे एकोपा जोपासला जातो. माझे कर्तव्य हे असेल कि माझा गाव माझा स्वर्ग आहे, तो स्वर्गच राहण्यासाठी मी माणूस म्हणून कधी या गोष्टींचा विचार केला का..?
मग विचार करा, नक्की बदल घडेल. आणि मगच तुम्ही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होण्याऐवजी गावाच्या विकासासाठी समाजसेवक बनाल.

जनहितार्थ:-
मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.
Affiliate of Muktai Foundations.
@विकास पाटील-बाबर.

No comments:

Post a Comment