ऊसशेतीला पर्यायी शेती आणि जोडधंदे काळाची गरज.
पुढील काळात ऊस शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी ऊस शेतीला पर्यायी शेती अंगिकारली पाहिजे. कारण शिल्लक साखर आणि उत्पादन गृहित धरता महाराष्ट्राकडे पुढील दोन वर्षाची साखर शिल्लक असेल, मुळात आर्थिक आरिष्टात सापडलेली साखर कारखानदारी या परिस्थितीत कशी तग धरेल.? काय दर देईल.? कधी देईल.? याबाबत साशंकताच आहे.
ब्राझील सह इतर ठिकाणी अतिरिक्त साखरेचे उत्पादन होणार आहे, हि सर्व साखर निर्यात होणार आहे त्यामुळे स्पर्धा निर्माण होवून साखरेचे दर हि कोसळणार आहेत.
मुळातच महाराष्ट्रातील साखर कारखानदारी राजकीय आडडे आहेत. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा या आडडयावरून व्यक्तिगत राजकारणाचे हित साधण्यासाठी सर्रास वापर सर्वश्रुत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ऊसदराबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी प्राधान्य मिळणे मुश्किल आहे.
येणाऱ्या काळात शेतकऱी ऊस पिकावर अवलंबून न राहता इतर पर्यायी पिके, जसे औषधी वनस्पती, फळबाग, शेती पूरक जोडधंदे याकडे वळून आर्थिक स्तर निश्चितच उंचावून शकतो. आर्थिक उत्पन्न देणारी नाविध्यपुर्ण, आधुनिकतेला जोड असणारी शेतीच करावी लागणार आहे. काही अंशी आळशी आणि परावलंबी, अशाश्वत उत्पन्न असणाऱ्या ऊस शेतीला वेळीच बगल देणे आवश्यक आहे, अठरा-वीस महिने शेतात असणारा ऊस, त्याअगोदरचा मशागत कालावधी, असा जवळजवळ दोन वर्षाचा कालावधी ऊस पिकात जातो, इतके करून ऊस पिकांचे बील निश्चित काळात मिळेल याची शाश्वती नाही. त्याबरोबर सततचे ऊस पिक, सततचे पाणी यामुळे जमिनीची सुपिकता धोक्यात येवून जमिनी नापीक होवू लागल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण बघता सततच्या ऊस पिक घेणाऱ्या क्षेत्रात ऊसाचे एकरी टनेज (उत्पन्न) दरवर्षी घटलेले निदर्शनास आले आहे.
आजचे आधुनिक तंत्रज्ञानाचे काळात ऊसा सारख्या आळसी पिकास झटकून आधुनिक जोड देऊन वेगवेगळी शेती, शेती संलग्नित जोडधंदे याकडे वळलेला युवा शेतकरी आज बहुतांश भागात दिसत आहे, तो फक्त परंपरागत ऊस शेतीत बद्दल अंगीकार करत पर्यायी मार्ग निवडल्यामुळेच, म्हणूनच आता ऊस शेतीवर अवलंबून न राहता, ऊस शेतीला पर्यायी शेतीकडे वळणे गरजेचे आहे.
विकास पाटील-बाबर.
मुक्ताई फाउंडेशन. संस्थापक अध्यक्ष.