Showing posts with label #CoronaFightIndia. Show all posts
Showing posts with label #CoronaFightIndia. Show all posts

Monday, 8 June 2020

तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जरूर विचार करा आणि निर्णय घ्या

तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जरूर विचार करा आणि निर्णय घ्या

महाराष्ट्र: आजचे कोरोना दृश्य परिस्थिती कमवता कुटुंबप्रमुख आणि कुटुंब सुरक्षित असणे काळाची गरज आहे. पुढील काळात दैवयोगाने कोणती वेळ केव्हा कशी येईल हे आजचे काळात सांगणे मुश्कील आहे.  आतापर्यंत बचत/इंशोरेशन/सुरक्षाबाबत सेवा सदैव आम्ही देत आलो आहेच.  परंतु पुढील काळात येणाऱ्या संकटावर मात करण्याबरोबरच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जरूर विचार करा आणि निर्णय घ्या हि विनंती.
कारण आता..........!
आपल्यासाठी टर्म इंशोरेशनचे कवच आणि आपल्या कुटुंबातील प्रियजन व्यक्ती करिता मेडिक्लेमचे कवच दोन्हींचा एकत्रितपणे दुग्धशर्करा योग प्रथमच.
अपाँईटमेंन्ट/अधिक माहिती करिता संपर्क@7350008383.

Thursday, 4 June 2020

विदयार्थी टेस्टिंग किट नाहीत, शाळा सुरू करण्याऐवजी अन्य पर्याय सरकारने अवलंबून पहावेत.


विदयार्थी टेस्टिंग किट नाहीत, शाळा सुरू करण्याऐवजी अन्य पर्याय सरकारने अवलंबून पहावेत.

महाराष्ट्र: एकीकडे आता लाँकडाऊन संपुष्टात येत असताना कोरोनाचा संसर्ग आटोक्यात नाही. उलट रूग्ण वाढतच चालले आहेत. लाँकडाऊन मुळे सामान्य लोकांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. अश्यातच देशभरात १ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शाळा सरू होण्याच्या बातम्‍यांनी देशासह जगभरातील पालकवर्ग आपल्‍या मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्‍तव चिंतेत आहेत.
                  कोरोनामुळे निर्माण झालेल्या वास्तविक परिस्थितीची जान सरकारला आहे. परंतु शाळा सुरु करण्यामागे आर्थिक गणित दडलेले असल्याचा शंका येथे निश्चित उपस्थित होते, कारण बहुतांश शैक्षणिक संस्था राजकीय नेत्यांच्या आहेत. आणि हे त्यांना चरण्यासाठी एक आर्थिक कुरण असल्याचे म्हणले तर वावगे ठरणार नाही. म्हणून विदयार्थ्यांना वेठीस धरण्यापेक्षा म्हणजेच शाळा सुरू करण्याऐवजी अन्य पर्याय सरकारने अवलंबून पहावेत. विदयार्थी टेस्टिंग किट नाहीत. आणि हे जर सरकार करणार नसेल तर सरकार शैक्षणिक खर्चाला बगल देत खाजगी नेत्यांच्या शाळांचे हित पाहते, आणि हयामागील आर्थिक गणित हि जाहीरपणे उघड होते.  पालकांना मुलांच्या शिक्षणाची काळजी निश्चित आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, परंतु आता निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कोरोना मुळापासून संपत नाही अथवा लस उपलब्ध होईपर्यंत शाळांना बंदच ठेवण्यात याव्यात. बहुतांश सरकारी/खाजगी शैक्षणिक संस्थाची  टाँयलेट, बेसिन, बैठक व्यवस्था यांच्या अवस्था दमनीय आहेत.
                 भारतातही आपल्‍या पाल्‍याच्या सुरक्षेसाठी चिंतेत असणार्‍या पालकांनी कोरोना संपत नाही तोवर शाळा बंद ठेवण्यासाठीची ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. त्‍यातूनच मग जगभरातील पालकांनी ऑनलाईन अभियान सुरू केले आहे. त्‍याचप्रमाणे  ज्‍यावर पाच लाखांपेक्षा अधिक पालकांनी स्‍वाक्षर्‍या केल्या आहेत. पालकांची मागणी आहे की, डिजिटल शिक्षण सुरू ठेवत, २०२० ला केवळ 'लर्निंग ईयर' म्‍हणून पाहिले जावे. तसेच कोरोना मुळापासून संपत नाही तोवर शाळांना बंदच ठेवण्यात यावे. ऑनलाईन स्‍वाक्षऱ्या अभियानासाठी जगातील प्रसिध्द वेबसाईट चेंज डॉट ओआरजीवर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरिया निशंक यांच्याकडे तूर्त शाळा बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. वेबसाईटवर चालणाऱ्या या अभियानासाठी १ लाख स्‍वाक्षऱ्यांचे लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र या याचिकेवर ५,२६,८४४ स्‍वाक्षऱ्या झाल्‍या आहेत.
           All India Parents Association चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टचे वरिष्ठ अधिवक्ता श्री. अशोक अग्रवाल यांनी हि देशातील सर्व राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना शाळा सुरू करू नयेत म्हणून अपील केली आहे.
विकास पाटील-बाबर.
मुक्ताई फाउंडेशन.

         

Sunday, 31 May 2020

राज्य सरकारची उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल. गरिबांना धान्य संचाऐवजी ५ किलो तांदूळ, लोकांबद्दल हिच का आस्था..?




राज्य सरकारची उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल. गरिबांना धान्य संचाऐवजी ५ किलो तांदूळ, लोकांबद्दल हिच का आस्था..?

                सामान्य, अति सामान्य लोकांबद्दल हिच आस्था आहे का सरकारची, उच्च न्यायालयाचा आदेश येथे मानला जात नाही तर सर्वसामान्य  लोकांचे काय...?  टाळेबंदीमुळे गरीब वर्गाची उपासमार होत असल्याने त्यांना अन्नधान्याची किट (१० किलो गहू, १० तांदूळ, १ किलो तूर डाळ, १ किलो तेल) वाटप करण्याच्या आदेशाला बगल देत राज्य सरकारने केवळ ५ किलो तांदूळ दोन महिन्यांसाठी वितरित करण्याचा आदेश काढला आहे.
टाळेबंदीच्या काळात स्थलांतरित कामगार तसेच भूमिहीन मजूरांना जगणे कठीण झाले. राज्य सरकारने केवळ शिधापत्रिका असलेल्यांना धान्यवाटप केले. पण, शिधापत्रिका नसलेले आणि स्थलांतरित मजुरांवर उपाशी राहण्याची वेळ आली.
याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यााठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत या सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी पश्चात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने शिधापत्रिका नसलेले आणि गरजू लोकांना शोधून काढण्यासाठी सव्‍‌र्हे करण्याचा १२ मे २०२० रोजी अंतरिम आदेश दिला. तसेच त्यांना १० किलो गहू, १० किलो तांदूळ, १ किलो तूर डाळ, १ किलो चना डाळ, १ किलो साखर, २५० ग्रॅम चहा पत्ती आणि १ किलो गोडे तेल मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहे. राज्य सरकारने मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष केले. राज्य शासनाने १९ मे २०२० रोजी निर्णय घेत शिधापत्रिका नसलेल्या आणि गरजवंतांना मे आणि जून महिन्यात प्रतिव्यक्ती केवळ ५ किलो तांदूळ वितरित करण्याचा निर्णय घेतला.
               करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंर्तगत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत शिधापत्रिका नसलेल्यांना अन्नधान्याचा लाभ देण्यात आला नाही. त्यांना आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय पॅकेजअंतर्गत विस्थापित मजुरांना मे व जून २०२० या दोन महिन्यांकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे, असे राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.
               राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याखाली केंद्र सरकारकडून मिळालेले धान्य राज्य सरकार नागरिकांना पुरवठा करीत असते. काही कार्यक्रम राज्य सरकार स्वत: राबवत असते. जसे केसरी कार्डधारकांना आम्ही खरेदी करून धान्य वाटप केले. साखर अंत्योदय कार्डधारकांना देतो. तेल आणि साखरेचा पुरवठा याकडे लक्ष देतो. नागपुरात राबवण्यात आलेला कार्यक्रम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी (एसडीआरएफ) आधारित कार्यक्रम आहे. त्याच अनुषंगाने उच्च न्यायालयाचा आदेश आहे.

Sunday, 24 May 2020

सैन्य अधिकाऱ्यांचा देशसेवेचा आदर्श राजकीय नेत्यांच्या कडे आहे का..?


                सैन्य अधिकाऱ्यांचा देशसेवेचा आदर्श राजकीय नेत्यांच्या कडे आहे का..?
                कोरोनामुळे संपूर्ण देशाची वाताहत झाली, याची झळ सामान्य आणि अति सामान्य जनतेच्या वाटयाला जास्त आली. हे लोक खऱ्या अर्थाने देशोधडीला लागले असल्याचे चित्र आहे. यांना सरकार, समाजिक संस्थाचे माध्यमातून थोडा दिलासा मिळाला असला तरी हा तात्पुरता  उपाय म्हणता येईल, कारण याचे दिर्घकालीन परिणाम येणाऱ्या काळात हि दिसणारे आहेत.
                कोरोनाच्या या लढाईत राजकीय नेत्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते आहे. या गोष्टींचा आम जनतेत उहापोह निश्चित आहे. हेच मोठे राजकीय नेते प्रत्येक निवडणुकीत कोटीचे कोटी खर्च करतात, त्याचबरोबर अगदीच गाव पातळीवरील सहकारी संस्था, सोसायटी, ग्रामपंचायत यांच्या निवडणूकीत पँनेल करिता लाखो-लाखो रुपये खर्च करतात. दारू-खानावळी घालतात. आणि हेच राजकीय नेते आता जागतिक संकट असलेल्या कोरोना महामारीत मूक गिळून गप्प बसतात. हे जनता आता ओळखून आहे. याचा परिणाम राजकीय नेत्यांना येणाऱ्या काळात निश्चित पाहावयास मिळले.
                 तर दुसरीकडे देशासाठी लढणाऱ्या, खऱ्या अर्थाने आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या देशातील अनेक सैन्य अधिकारी, कर्मचारी यांनी हि कोरोना महामारीच्या लढाईत आर्थिक योगदान देऊन देशाला खऱ्या अर्थाने कृतज्ञ केले आहे. याची सुरुवात चीफ आँफ डिफेन्स स्टाप (सीडीएस) बिपिन रावत यांनी केली, त्यांनी आपल्या वेतनातून दर महिन्याला ५० हजार रुपयांची मदत पीएम केअर्स फंडात केली आहे. ते एक वर्षे हि मदत देणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सदस्य आणि तटरक्षक दलाचे माजी प्रमुख राजेंद्र सिंह यांनी त्यांच्या वेतनाच्या ३०% टक्के हिस्सा पीएम केअर्स फंडाला दिला आहे. इतर सर्वांची विस्तृत माहिती येथे आता शक्य नाही परंतु इतरही अनेक सैन्य अधिकारी अश्या प्रकारे योगदान देत आहेत.
                 येथे मुद्दा एकच येतो चोवीस तास डोळ्यात तेल घालून प्राणांची चिंता न करता आपल्या देशाचा सैनिक देश सेवा करीत आपले आर्थिक योगदान देत आहे.  अगदीच लहान मुले आपला वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करून, वाढदिवसाचा खर्चाचे पैसे पीएम केअर्स फंड वा गरजूंच्या मदतीला धावत आहेत.
                     मग राजकीय नेते देश आर्थिक सुस्थितीत येईपर्यंत त्यांना मिळणारा पगार (मानधन) का नाही देवू शकत,  देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्याकरिता एक-दोन पगार देऊन सुटण्याचे संकट नाही हे जाणून असणाऱ्या राजकीय नेत्यांना निवडणूकीत कोट्यवधी रुपयांचे खर्च बरा जमतो. अश्या वेळी सरकारी उपाययोजना राबविण्यात व किरकोळ किट वाटपात धन्यता न मानता ठोस उपाययोजना कराव्यात, त्याकरिता त्यांनी देश सुस्थितीत येईपर्यंत पगार (मानधन) स्वीकारू नये. व निवडणूक काळातील खर्च गोरगरीब लोकांकरिता, अडचणीत असलेल्या उदयोगाला, छोटे छोटे काम-धंदे करणाऱ्या लोकांना,  व्यवसायिक अडचणीत आलेल्या युवकांना आताच कोरोना माहामारीच्या काळात करावा. निदान यातून तरी त्यांची आम जनते विषयी व देशा विषयी सेवेची प्रगल्भता दिसून येईल.
विकास पाटील-बाबर.
मुक्ताई फाउंडेशन.