Showing posts with label #Revenue Department. Show all posts
Showing posts with label #Revenue Department. Show all posts

Monday, 25 May 2020

नोंदणी कार्यालयातील अधिकारी वर्गाने पक्षकार यांना सन्मानाची वागणूक द्यावी: अँड प्रवीण नलवडे.


नोंदणी कार्यालयातील अधिकारी वर्गाने पक्षकार यांना सन्मानाची वागणूक द्यावी: अँड प्रवीण नलवडे 

पुणे, प्रतिनिधी:
नोंदणी कार्यालय नोंदणीसाठी सज्ज झालेली असली व काही प्रमाणात दस्तनोंदणी होत असले तरी  गेल्या दोन महिन्याचे काळात   लॉक डाऊनलोड दस्त नोंदणी बंद झाल्यामुळे  शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात थांबलेला आहे सर्व विभागांमध्ये नोंदणी विभाग हा राज्य शासनाला नंबर दोन चा महसूल देणारा विभाग आहे. सध्याच्या परिस्थितीत लॉक डाऊन  मुळे पक्षकार   वकील वर्ग  यांचेवर शारीरिक आर्थिक व मानसिक तणाव निर्माण झालेले आहे आता अशा परिस्थितीत पक्षकार वकील ज्यावेळी दस्त नोंदणीसाठी नोंदणी कार्यालयात येतील त्यावेळी नोंदणी विभागाकडून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सहकार्याची  अगत्याची व विनयशील वागणूक  मिळणे अपेक्षित आहे .
पक्षकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व अत्यावश्यक आरोग्यसुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजना  संपूर्ण दक्षता कार्यालयाकडून घेणे अपेक्षित आहे.जसे भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित तज्ञ व्यक्ती पुण्यामध्ये येऊन पाहणी करत आहेत. उपाय योजना सुचवत आहेत त्याप्रमाणे नोंदणी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व निबंधक कार्यालयामध्ये स्वतः व तज्ञ व्यक्तीमार्फत पाहणी करणे आवश्यक आहे आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या सूचनेनुसार योग्य ती उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. निबंधक कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावरच सर्व जबाबदारी सोपवून चालणार नाही. त्यासाठी शासनाने प्रत्येक नोंदणी कार्यालयकरिता योग्य तो निधी मंजूर करणे आवश्यक आहे व त्या निधीचा वापर स्टॅम्प चे माध्यमातून  राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल देणाऱ्या पक्षकारांचे आरोग्याच्या सुरक्षते त्याकरता करणे आवश्यक आहे.
कन्व्हसिंग क्षेत्रांमध्ये पुणे शहरातील पाच हजारापेक्षा जास्त वकील काम करत आहेत पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्याचे ग्रामीण भागातही वकील वर्ग कन्व्हसिंग मध्ये काम करत आहे या सर्व वकील वर्गाचे प्रतिनिधित्व कन्व्हसिंग प्रॅक्टिशनर असोसिएशन ही नोंदणीकृत संघटना अनेक वर्षापासून करत आलेली आहे.
सर्वांच्या समन्वयातून चांगल्या उपाय योजना होऊ शकतात व त्यासाठी संघटना संघटनेचे पदाधिकारी व समस्त वकील वर्ग नोंदणी विभागात सहकार्य करण्यास तयार आहे असे विचार संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण नलवडे यांनी व्यक्त केले.
दस्त नोंदणी संदर्भात काही अडचणी निर्माण झाल्या होत्या काही दस्त नोंदणी करणे बाबत नाकारण्यात येत होते याबाबत संघटनेचे अध्यक्ष सुधाकर  कुठे  सचिव अमोल संजय कर्डिले अमोल काजळे, पांडुरंग थोरवे, कल्याण शिंदे, सोमनाथ हरपुडे यांनी पुण्या चे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. नोंदणी विभागाने दस्त नोंदणी सर्वांना सोयीस्कर होईल अशी स्वरूपाचे नुकतेच योग्य असे परिपत्रक जारी केलेले आहे समन्वयातून अनेक प्रश्न सुटतात याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कृष्णा के. देशमुख.
पुणे, प्रतिनिधी.