Thursday, 2 July 2020

#ग्राहक म्हणून मिळालेले हे 6 हक्क तुम्हाला माहीत आहेत..?



#ग्राहक म्हणून मिळालेले हे 6 हक्क तुम्हाला माहीत आहेत..?

एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना काय असतात तुमचे हक्क आणि जबाबदाऱ्या याची माहिती करून देणारे हे 6 मुद्दे. 

प्रत्येक ग्राहकाला आपल्या हक्कांची जाणीव असायला हवी असं ग्राहक चळवळीचं म्हणणं आहे. 

ग्राहकांनी चोखंदळ आणि चिकित्सक असायला हवं जेणेकरून आपली कुणी फसगत करणार नाही. 

ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत. त्यांची माहिती असल्यास आपली फसवणूक होणार नाही. 
1) #सुरक्षेचा हक्क 
आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असतं. 

आपण ज्या वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता हाच एकमेव निकष नाही तर त्या वस्तू सुरक्षितही असाव्यात. इलेक्ट्रिकल उत्पादनं घेताना ही काळजी घेणं आवश्यक आहे. 

वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसंच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात. 

या वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते. 
2) #माहितीचा हक्क
एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. 

एखादं उत्पादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही. 

सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे. 
3) #निवड करण्याचा अधिकार
आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच ब्रॅंडच्या वस्तू दुकानदार विकत घेण्यास सांगत असेल तर लक्षात घ्या की, हे तुमच्या हक्कांचं उल्लंघन आहे. (अपवाद फक्त विशिष्ट ब्रॅंडच्या आउटलेटचा.) 

समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही शीतपेय मागितलं. पण वेटरनं म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच कंपनीचं शीतपेय मिळेल तर हे तुमच्या हक्कांविरोधात आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. 
4) #तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क 
जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. 

ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारनं तक्रार निवारण केंद्र आणि ग्राहक न्यायालयांची स्थापना केली आहे. 

इतकंच नाही तर ग्राहक त्यांच म्हणणं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना करू शकतात. 

या ग्राहक मंचाचं शिष्टमंडळ आपलं म्हणणं सरकारकडे मांडू शकतं. सरकार त्यांच्या सूचना आणि शिफारसींवर विचार करतं. 

जर ग्राहकाची फसगत झाली असेल तर त्याला तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे. जर तक्रार रास्त असेल तर तिचं निवारण होईल असा हक्क कायद्यानं ग्राहकाला दिला आहे. 

कधीकधी एखादी तक्रार लहान असू शकते पण तरी देखील त्याविरोधात दाद मागता येऊ शकते. 
6) #ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार
ग्राहक हक्क शिक्षणाच्या अभावामुळं ग्राहकांची फसवणूक होते असं ग्राहक हक्क चळवळ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 

ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, तसंच स्वयंसेवी संस्था शिबिरं किंवा कार्यशाळा घेत असतात. 

"ग्राहक शिक्षणावर सगळ्यात जास्त भर असायला पाहिजे. जेणेकरून प्रत्येक ग्राहक सक्षम होईल.

ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य 

ग्राहकांना केवळ हक्कच आहेत असं नाहीत. त्यांच्या काही जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्यं देखील आहेत याची जाणीव देखील त्यांना असायला हवी. 

ग्राहकांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, एगमार्क आणि ISO प्रमाणित उत्पादनं विकत घ्यावीत. "प्रमाणित केलेली उत्पादनं सुरक्षेची एकप्रकारे हमी देतात, म्हणून ती घेणं योग्य ठरतात.
                    
                    जनहितार्थ प्रकाशित.
                           मानवाधिकार आणि ग्राहक संरक्षण.      
                 Affiliate of Muktai Foundations.
                   @विकास बाबर-पाटील.

        
        

     




Wednesday, 24 June 2020

एमबीबीएस एमडी डॉक्टर की मात्र फी ₹5 इससे कर्मशियल नालायक डाँक्टर क्या सीख लेगें...?



एमबीबीएस एमडी डॉक्टर की मात्र फी ₹5 इससे कर्मशियल नालायक डाँक्टर क्या सीख लेगें...?

              आपको ऊपर तस्वीर में दिख रहे एकदम आम वस्त्र धारण किए हुए एक छोटे से पेपर के टुकड़े पर कुछ लिखते हुए एक व्यक्ति नजर आ रहे हैं. उनका परिचय डॉक्टर शंकर गौड़ा एमबीबीएस एमडी. केमडुआ जिला. कर्नाटक यह है.
              इनके पास अपना ओपीडी/चेंबर नहीं है यह बताते हैं कि ओपीडी/चेंबर बनाने में 400000 रूपये लगेंगे,  जो उनके पास नहीं है इनका अपना घर इनके शहर से कुछ दूर गांव में है, जहां छोटे-छोटे दो कमरे हैं, यह बताते हैं कि मेरे मरीज इतनी दूर कैसे आएंगे इसलिए, वो खुद सवेरे 8:00 बजे शहर पहुंचकर एक फास्ट फूड रेस्टोरेंट की दीवार पर बैठकर गरीब मरीजों को देखता हैं.
             .रोजाना इनके पास लगभग 100 से ऊपर मरीज आते हैं जिनकी यह हर प्रकार की जांच करते हैं और इनको सस्ती जेनेरिक दवाइयां लिखते हैं ताकी जिससे मरीजों के ऊपर आर्थिक बोझ ना पड़े
सबसे मजेदार बात इन डॉक्टर साहब की यह है कि यह मरीजों से केवल ₹5 फीस लेते हैं जी हां सही पढ़ा आपने केवल ₹5 आज के इस                            आधुनिक युग में एक एमबीबीएस एमडी डॉक्टर ₹5 मात्र अपनी फीस ले वाकई उनका यह कृत्य एवं सेवा भाव को नमन है.
               यह देखकर शरम आनी चाहिए कर्मशियल नालायक डाँक्टर लोगोको जो दिनदहाडे गरीब लोगोको लुटते है.

Wednesday, 17 June 2020

Saturday, 13 June 2020

शाळा सुरू करण्याविरोधात पालकांची बाल हक्क आयोगाकडे धाव


महाराष्ट्र:- पावसाळी अधिवेशन २२ जूनऐवजी ३ आँगस्टपासून. शाळा सुरु करण्यासाठी मात्र क्रियाशील. देशाचे भवितव्य असणाऱ्या मुलांपेक्षा राजकीय शिक्षण सम्राट पोसण्यावर भर. शाळा सुरू करण्याविरोधात पालकांची बाल हक्क आयोगाकडे धाव

Monday, 8 June 2020

तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जरूर विचार करा आणि निर्णय घ्या

तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जरूर विचार करा आणि निर्णय घ्या

महाराष्ट्र: आजचे कोरोना दृश्य परिस्थिती कमवता कुटुंबप्रमुख आणि कुटुंब सुरक्षित असणे काळाची गरज आहे. पुढील काळात दैवयोगाने कोणती वेळ केव्हा कशी येईल हे आजचे काळात सांगणे मुश्कील आहे.  आतापर्यंत बचत/इंशोरेशन/सुरक्षाबाबत सेवा सदैव आम्ही देत आलो आहेच.  परंतु पुढील काळात येणाऱ्या संकटावर मात करण्याबरोबरच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. जरूर विचार करा आणि निर्णय घ्या हि विनंती.
कारण आता..........!
आपल्यासाठी टर्म इंशोरेशनचे कवच आणि आपल्या कुटुंबातील प्रियजन व्यक्ती करिता मेडिक्लेमचे कवच दोन्हींचा एकत्रितपणे दुग्धशर्करा योग प्रथमच.
अपाँईटमेंन्ट/अधिक माहिती करिता संपर्क@7350008383.

Sunday, 7 June 2020

एखादयाचे चांगले करायला वेळही नाही. पण पठ्ठ्याला शेजारच्याचा बांध कोरायला फार वेळ


एखादयाचे चांगले करायला वेळही नाही. पण पठ्ठ्याला शेजारच्याचा बांध कोरायला फार वेळ

महाराष्ट्रातील सगळ्या गावांमध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल...? तर बांध. एखादयाचे चांगले करायला  वेळही नाही. पण पठ्ठ्याला शेजारच्याचा बांध कोरायला फार वेळ असतो. मला अजुनही समजलंच नाही की या बांधात काय अडकलेलं असतं. एक पाभार दोन पाभार जास्तीत जास्त एक गुंठा लुबाडली. तर किती उत्पन्न निघत असेल. पण मराठी माणुस तो विनाकारण त्रास दिल्याशिवाय चैन नाही.  लोकांच्या जमीनी कोरुन करोडपती झाल्याची एकतरी बातमी कधी ऐकलीय का..? पण आम्ही दळभद्री माणसं बांध कोरायचे बंदच नाहीत. माझी दहा एकर...पंधरा एकर...आहे...नुसत्या बाता ऐकायच्या. या मायभुमीवर किती आले आणि किती गेले ती आहे तशीच जागेवर आहे. आपण फक्त  गमजा मारायच्या....याच मायभूमीनं जन्माला घातलं...वाढवलं...पालनपोषण केलं....आणि शेवटी स्वतःमधे सामावुन घेतलं. डोळ्यादेखत मी मी म्हणणारे वाघासारखे डरकाळ्या फोडणारे अक्षरशः धुळीला मिळाले..पण आम्ही मात्र तसेच सांड...काहीच फरक नाही...दोन दिवसाचं तारुण्य ,शक्ती संपली की मग ताळ्यावर येतो..बांध कोरणारांनी बंगले बांधले नाहीत..अलिशान गाड्या घेतल्या नाहीत कारण ज्यांनी बंगले बांधले , अलिशान गाड्या घेतल्या..,त्यांना काहीतरी साध्य करण्याच्या नादात बांध कोरायला वेळच  नव्हता...असं म्हणतात की टिव्हीवर , पेपरमध्ये बीएडब्ल्यु , मर्सिडीज , जॕग्वार...अॉडी..अशा गाड्यांच्या जाहीराती का नसतात..कारण ह्या गाड्या खरेदी करणारे जाहीराती पाहत बसत नाहीत. त्यांना वेळच नसतो...ते बीझी असतात ध्येय प्राप्तीसाठी.. पण इथं बांध कोरणारे भाकरीला महाग असतात..नुसत्या शर्टाची बटणं उघडी ठेऊन छाती छप्पन्न इंचाची होत नाही. पानं, गुटखा खाऊन तोंडं लाल केली म्हणून कोणी पाटील होत नाही...रोज दारुच्या बाटल्या रिचवुन राजेमहाराजे होता येत नाही. कोणी शर्यत जिंकत नाही.दररोज लोकांची निंदा नालस्ती..करायची ह्याला नावं ठेव ..त्याला नावं ठेव असं करुन कोणीच प्रशासकीय अधिकारी झाला नाही.थोडक्यात काय तर.....शेणातला किडा शेणातच राहतो..त्या फुलातला मकरंद काय कळणार....शेवटी...आयुष्य मर्यादित आहे. आनंद बिनधास्त घेत जगा...दुःखाचं प्रदर्शन करत जगण्यापेक्षा..प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या...मातीत जन्मलास...मातीत विलिन होणार...मग मिजास काय कामाचा....माणुस म्हणुन जग ना बाबा.....लोकांची वाट लावायच्या नादात...तुझी केव्हा लागेल कळणार पण नाही...बांध कोरण्यापेक्षा आपआपसातील शत्रृत्वाचे बांध नष्ट करून पुढच्या पिढीलास्वतः चा आदर्श निर्माण करा.

Thursday, 4 June 2020

विदयार्थी टेस्टिंग किट नाहीत, शाळा सुरू करण्याऐवजी अन्य पर्याय सरकारने अवलंबून पहावेत.


विदयार्थी टेस्टिंग किट नाहीत, शाळा सुरू करण्याऐवजी अन्य पर्याय सरकारने अवलंबून पहावेत.

महाराष्ट्र: एकीकडे आता लाँकडाऊन संपुष्टात येत असताना कोरोनाचा संसर्ग आटोक्यात नाही. उलट रूग्ण वाढतच चालले आहेत. लाँकडाऊन मुळे सामान्य लोकांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. अश्यातच देशभरात १ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. शाळा सरू होण्याच्या बातम्‍यांनी देशासह जगभरातील पालकवर्ग आपल्‍या मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्‍तव चिंतेत आहेत.
                  कोरोनामुळे निर्माण झालेल्या वास्तविक परिस्थितीची जान सरकारला आहे. परंतु शाळा सुरु करण्यामागे आर्थिक गणित दडलेले असल्याचा शंका येथे निश्चित उपस्थित होते, कारण बहुतांश शैक्षणिक संस्था राजकीय नेत्यांच्या आहेत. आणि हे त्यांना चरण्यासाठी एक आर्थिक कुरण असल्याचे म्हणले तर वावगे ठरणार नाही. म्हणून विदयार्थ्यांना वेठीस धरण्यापेक्षा म्हणजेच शाळा सुरू करण्याऐवजी अन्य पर्याय सरकारने अवलंबून पहावेत. विदयार्थी टेस्टिंग किट नाहीत. आणि हे जर सरकार करणार नसेल तर सरकार शैक्षणिक खर्चाला बगल देत खाजगी नेत्यांच्या शाळांचे हित पाहते, आणि हयामागील आर्थिक गणित हि जाहीरपणे उघड होते.  पालकांना मुलांच्या शिक्षणाची काळजी निश्चित आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, परंतु आता निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कोरोना मुळापासून संपत नाही अथवा लस उपलब्ध होईपर्यंत शाळांना बंदच ठेवण्यात याव्यात. बहुतांश सरकारी/खाजगी शैक्षणिक संस्थाची  टाँयलेट, बेसिन, बैठक व्यवस्था यांच्या अवस्था दमनीय आहेत.
                 भारतातही आपल्‍या पाल्‍याच्या सुरक्षेसाठी चिंतेत असणार्‍या पालकांनी कोरोना संपत नाही तोवर शाळा बंद ठेवण्यासाठीची ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. त्‍यातूनच मग जगभरातील पालकांनी ऑनलाईन अभियान सुरू केले आहे. त्‍याचप्रमाणे  ज्‍यावर पाच लाखांपेक्षा अधिक पालकांनी स्‍वाक्षर्‍या केल्या आहेत. पालकांची मागणी आहे की, डिजिटल शिक्षण सुरू ठेवत, २०२० ला केवळ 'लर्निंग ईयर' म्‍हणून पाहिले जावे. तसेच कोरोना मुळापासून संपत नाही तोवर शाळांना बंदच ठेवण्यात यावे. ऑनलाईन स्‍वाक्षऱ्या अभियानासाठी जगातील प्रसिध्द वेबसाईट चेंज डॉट ओआरजीवर केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरिया निशंक यांच्याकडे तूर्त शाळा बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. वेबसाईटवर चालणाऱ्या या अभियानासाठी १ लाख स्‍वाक्षऱ्यांचे लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र या याचिकेवर ५,२६,८४४ स्‍वाक्षऱ्या झाल्‍या आहेत.
           All India Parents Association चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्टचे वरिष्ठ अधिवक्ता श्री. अशोक अग्रवाल यांनी हि देशातील सर्व राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना शाळा सुरू करू नयेत म्हणून अपील केली आहे.
विकास पाटील-बाबर.
मुक्ताई फाउंडेशन.